हैडलाइन

गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक वेगळीच उंची मिळाली, जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले, आणि गडकरी यांनी स्टेजवरून खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी संदेशाने स्पर्धेला नवा जोश मिळाला.


या प्रसंगी प्रमोद कुमार बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव, राहुल शेवाळे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, रणजीत सावरकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष, राकेश तिवारी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव, मिलन वैद्य महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष यांच्यासह आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, दीपक सावंत, संजय निरुपम, मनीषाताई कायंदे, किरण पांडव, श्रीमती देवांग आणि अर्जुन अवॉर्ड विजेते गोपाल देवांग यांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,

“खासदार चषकाच्या माध्यमातून आम्ही ६५ विविध खेळांना प्रोत्साहन देत आहोत. बॉक्सिंगसारखा दमदार खेळही त्यात महत्त्वाचा भाग आहे.” त्यांच्या या वक्तव्याने खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.विशेष म्हणजे, गडकरी यांनी बॉक्सिंगचे ग्लोव्हज परिधान करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कृतीने आणि संदेशाने उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत गडकरी म्हणाले,“ही स्पर्धा तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ आहे… मेहनत करा, देशाचं नाव उज्वल करा.”या भव्य उद्घाटनामुळे नागपूर शहरात बॉक्सिंगचा उत्साह शिगेला पोहोचला असून, देशभरातील युवा बॉक्सर आता रिंगमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

                 


Most Popular News of this Week

संसदीय गटनेते डॉ श्रीकांत...

मुंबई, ता. 6 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात राबविल्या जाणाऱ्या...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

 टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित...

महाराष्ट्र बॉक्सिंग...

मुंबई, ता. 2 : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी 7 वी, 17...

उद्धवजी की विधायकी के लिए...

संजय राउत चाहते हैं कि उद्धव ठाकरे विधानमंडल में जाएं, लेकिन वे वास्तव में...

संजय राउत अपने ही पार्टी में...

अशोक खरात मामले की जांच से संबंधित जानकारी अंजली दमानिया को मुख्यमंत्री...

गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग...

नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक...