हैडलाइन

MSEDCL व पोलीस प्रशासन बैठकीत नगरसेवक निशांत भगत यांची भूमिका

नवी मुंबईच्या वाशी-सानपाडा येथील प्रभाग क्र. १८ मधील वाशीगाव, सेक्टर ३१, ३१ (ए) गावठाण विस्तार योजना परिसर, सानपाडा - सोनखार (पामबीच) व वाशी सेक्टर १७ या विभागातील अनियमित वीजेची समस्या सोडविल्यास वीज वितरण अधिकारी, अभियंत्यांचा सत्कार करु अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक निशांत भगत यांनी MSEDCL व पोलीस प्रशासन बैठकीत दिला. गेल्या महिन्याभरापासून या परिसरातील नागरिक आणि व्यापा-यांना विविध तांत्रिक कारणांमुळे १२ तासांपेक्षा अधिक तास वीजपुरवठा खंडित होणे, महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान आणि खोदकाम व केबल दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांना वीजेच्या विविध तांत्रिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. 

नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांच्यासोबत MSEDCL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २९ एप्रिल रोजी वाशीगाव येथे घेतलेल्या बैठकीनंतरही गेल्या महिन्याभरात परिस्थितीमध्ये कोणतीच सुधारणा झालेली नाही. उन्हाचा पारा वाढत असताना आणि वारंवार सूचना व हरकती दाखल करुनही वीज ग्राहकांच्या तक्रांरीची दखल घेतली जात नसल्यामुळे या विषयाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 

प्रभाग क्र. १८ मधील वाशी - सानपाडा विभागातील वीज पुरवठ्यासंबंधित समस्यांबाबतीत वीज वितरणचे अधिकारी लोप्रतिनिधिंसह परिसर निहाय संयुक्त सर्वेक्षण करणार आहेत. वीज पुरवठ्या संबंधित कोणत्याही समस्येबाबत माहिती देणे व तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यासाठी अधिकारी, अभियंते व नागरी प्रतिनिधींमचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे, वाशीगाव परिसरातील एकूण सहा डिपींपैकी कोणत्याही एका डीपी मध्ये बिघाड झाल्यास पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरु रहावा म्हणून या सहाही इंटरलिंकिंग करण्यात येईल, वीज पुरवठा स्थिर व अखंडित राहण्यासाठी आवश्यक आरएमयू (RMU) युनिट बसविण्यात येणार, विभागातील विद्युत पुरवठा करणा-या जुन्या, नादुरुस्त व जॉईंट्स मारलेल्या केबल वाहिन्या बदलणे, ही सर्व कामे महिन्याभराच्या आत पूर्ण करण्याचे ठोस आश्वास वीज वितरणचे वाशी विभागीय अधिक्षक अभियंता दिपक पाटील यांनी बैठकीत पोलिसांसमक्ष नगरसेवक व नागरिकांना दिले.


नगरसेवक निशांत भगत यांनी बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्याकडे महिन्याभरात जर MSEDCL कडून वीज पुरवठा सेवेत सुधार न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आणि वीज वितरण विभागाने आश्वासित मागळ्या वेळेत पूर्ण केल्यास अधिकाऱी व अभियंत्याचा सत्कार करू अशी भूमिका मांडली.

या समन्वय बैठकीला नगरसेविका प्रिती संदीप भगत, वितरण मंडळाचे अधिकारी व अभियंते, समाजसेवक संदिप भगत आणि प्रभागातील नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.




Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...